Search This Blog

Showing posts with label Young Worrier Campaign. Show all posts
Showing posts with label Young Worrier Campaign. Show all posts

Sunday, August 1, 2021

Young Worrier Campaign

Young Worrier Campaign

 

 माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी यंग वारियर कॅम्पेन

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र व  युनिसेफ यांच्या सहकार्याने covid-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी यंग वारियर कॅम्पेन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

8 वी ते 12 वीच्या वर्गात अध्ययन करणार्‍या विद्यार्थ्यांनी कौटुंबिक बांधिलकी जोपासण्याचा हेतूने covid-19 या आजाराबाबत आपल्या कुटुंबामधील सदस्यांमध्ये जागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कुटुंबामध्ये covid-19 या आजाराबाबत जागृती करून योग्य काळजी घेतल्यास या आजारापासून कुटुंबाला सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये जागृती करता येईलया उद्देशाने SCERT व युनिसेफ यांच्या वतीने इयत्ता 8 वी ते 12 वीच्या वर्गात अध्ययन  करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे.

या उद्बोधन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी खालील  U tube link चा वापर करावा.

------------------------------------------------------

सोमवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 12

----------------------------------------------------

इयत्ता वी ते  12 वीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दि. ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन सत्र आयोजित केलेले आहे.

या सत्रासाठी खालील U tube link  द्वारे सहभागी होता येईल.


दि. ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते 12

----------------------------------------------------

या उपक्रमांमध्ये इयत्ता वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या राज्यातील सर्व माध्यमाच्यासर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग नोंदवावा. या उपक्रमाची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांपर्यंत पोहोचवावी.

संयोजक:

 श्री. दिनकर टेमकर 

 संचालक

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रपुणे.