Marathi Translation:
मंद वारा, संथ धारा
जणू ते जहाज उभे कसे
जसे परमपित्या चा नियमच जणू तो
सांगाडा उभा धीर समुद्रावरी
पाषाणवरून इंचकेप च्या वाहत त्या धारा
न लागे चाहूल कधी न लागे ही ध्वनी
वाहत झूळमुळं , नाही त्यानां उसळ ना ही त्यानां उभार
घंटा ही पाषाणावरीं संथ उभी विठेवरी
सहृदय तो मठपती आबेरब्रोथोक चा
जाऊने बांधली हीं घंटा उभी त्या
पाषाणवरीं
हेलकावती जेव्हा येई वादळ वारे
कधी इकडे ,कधी तिकडे करी सूर मिसळून
वादळा संगे, देई नाविका सी हाक सावधतेची
लहरी लाटा उसळून आता , मिटे अस्तित्व इंचकेप पाषाणाचे
मात्र तो ध्वनी घंटानाद करूनी सावध
नाविकासी
येऊन पाही तो भीषण हा पाषाण दडला खाली समुद्रलहरी
नाविकजन जोडून हात, करी ध्यान त्या
सहृदय मठपती आबेरब्रोथोक चे
हा तो तेजस्वी सूर्य, शिंपडीत सोनेरी किरणं
जगी आनंद, मनी स्वानंद प्राणी, जलचर आणि मानव
समुद्र पक्ष्यांचे हे थवे, आनंदित सांगे हे हवे , ते हवे
हिरवागार समुद्रममाथा,त्यावरी दिसे काळा ठिपका उंच तो आता
बेफिकरी भटक्या तो सर राल्फ चालीत गलबतावरी पाहे त्या अंखड काळ्या ठिपक्यावरी
ओठावर शीळ, मनं अधीर, ना सुधीर
मनाच्या ह्या आनंदाला कडा घृणा आणि मंत्सराचा
डोळयात घेऊन राग, 'हा जाऊनी करितो त्या
पाषाणावरी घंटेची राख
सोडा हो पाण्यावर होडी, ही करतो मी खोडी
छाटोनि टाकितो हि दोरी, घंटा जी बांधली मठपती आबेरब्रोथोक ने'
जमली सगळी ही माणसे, सोडली दोरी ती
धाडसे
करी कूच पाषाणकडे, सर राल्फ वाकिला थोडा, घाली चांगल्या कामी खोडा
कापूनि घंटा, मनी उसळी आनंदी लाटा
करिती सरर गेली घंटी, क्षणी समुद्र तळी
म्हणे तो राल्फ, ' आता ना जोडी कोणी हात, ना करी कोणी बात त्या मठपती आबेरब्रोथोक चे'
भटक्या सर राल्फ, होऊन लाटांवरीं स्वार
लुटली जहाजे जी व्यापार, धन साठवले ते अपार
सुकाणू फिरवीत पुनः वाट धरिली परतीची
तिरीं स्कॉटलंड
मावळला हां दिवस जरी, न दिसे हा रवी तरी
आभाळी साचले धुक्याने पुरे, वादळवारा दिवस प्रहरी, सांज तरी शांत करी आकांत नाही वारा
अंधार जरी आता बाका, धिराने होडी हाका
काही नाही दिसत तरी, चंद्र आहे क्षितिजावरी,प्रकाश त्याचा मंद परी, वाट दावेल घरी
बोले एक नाविक, 'का आलो जवळ कुणा बेटा सर्शी, ना ऐकू लाटांची खळखळ,
पाषाणावरी आपटणाऱ्या जलाची थडथड
असती जर का ती घंटा, नसती भरली हि घटका'
शांतता भयाण मात्र, लाटांचा उसळी मेरू
खेळ मृत्यूचा आला रंगू, ना कुठे वारा, नाही पडत गारा, हेलकावत चाले होडी, निसर्गाने चांगलीच मोडली सर राल्फ ची खोडी
धडकतास त्या पाषाणावर होडी
सुरु झाली सफर तळाशी, येशू चे नाव येई ओठाशी
स्वतःला देत शिव्या आणि शाप
ओढीले केस टराटरा, होडीत शिरले पाणी भराभरा
तळ दिसे सरळ, मृत्यू आता अटळ
सर राल्फ पाही उघड्या डोळा , मृत्यू हा अजीब सोहळा, तळाशी ती इंचकेप घंटा कींणकींणत , जणू यमलोकाची वाट खूणवित्त
Poem: Inchcape Rock'
Poet: Robert Southey
रुपांतर: समीर खासनीस
श्री टी पी भाटिया महाविद्यालय, कांदिवली वेस्ट
मुंबई
808026616

No comments:
Post a Comment