Search This Blog

Tuesday, August 3, 2021

आझादी का अमृत महोत्सव

आझादी का अमृत महोत्सव

चला सहभागी होऊया- स्वातंत्र्य गीत गायनात.


परीपत्रक-

“आझादी का अमृत महोत्सव” उपक्रमाची अंमलबजावणी करणेबाबत.

संदर्भ : 1.शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे मेलवरील संदेश पत्र क्रं. D.O.No.17-10/2020-EE. दि.2९ जुलै  २०२१

उपरोक्त संदर्भ क्र.१ नुसार, भारत सरकार आझादी का अमृत महोत्सव (AZADI KA AMRUT MAHOTSAV) अंतर्गत कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे भारताच्या स्वातंत्र्याची 75 वी जयंती साजरी करत आहे.  AKAM या उपक्रमाची सुरुवात 12 मार्च 2021 रोजी झाली असून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अंमलबजावणी होणार आहे. सदर महोत्सव लोकसहभागाच्या (जन-भागिदारी) भावनेने लोकोत्सव (जन-उत्सव) म्हणून साजरा केला जाईल.  AKAM अंतर्गत होणारे पाच कार्यक्रम ठरविण्यात आलेले आहेत ते पुढीलप्रमाणे : 

1) Freedom Struggle 

2) Ideas at 75

3) Achievements at 75

4) Actions at 75

5) Resolve at 75


शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग,नवी दिल्ली AKAM चा एक भाग म्हणून या काळात अनेक कार्यक्रमांचा समन्वय साधत आहे. आगामी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे "राष्ट्रगीत" गाणे आणि विशेषतः याकरिता तयार केलेल्या वेबपेज 

https://rashtragaan.in 

वर सादरीकरण अपलोड करणे. 

सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशातील शाळांसह, शासकीय, शासकीय अनुदानित आणि खाजगी शाळांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे कळविण्यात येत आहे.

सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य यांना सदर उपक्रमाबद्दल माहिती द्यावी आणि त्यांनी उस्फूर्तपणे उपक्रमात सहभागी  व्हावे.


सर्व शैक्षणिक प्रशासकीय संस्था तसेच SCERT/DIET/BRC/CRC इत्यादी मधील अधिकारी व  कर्मचारी यांनीही उपक्रमात उत्साहाने सहभागी व्हावे.

उपक्रमात सहभागी होत असताना Covid-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

सहभागाची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2021 आहे तत्पूर्वी सर्व सहभागी यांनी

 https://rashtragaan.in 

या वेबसाईटवर जाऊन राष्ट्रगीताचे सादरीकरण अपलोड करावे.

तरी शिक्षण विभागाचे राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय सर्व आस्थापनांना तसेच त्यांचेमार्फत शाळा, समाज यांना सदर महत्त्वपूर्ण उपक्रमांत सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावरून अवगत करावे व उपक्रमात अधिकाधिक सहभाग नोंदवावा.

 सामाजिक शास्त्र, कला व क्रीडा विभागामार्फत सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे.                                                                                                                        

- एम.डी.सिंह (भा. प्र. से.)

संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


या कार्यक्रमात खालील सर्वांनी आपल्या सर्व कर्मचारी यांना माहिती देऊन सहभागी करून घेणे आवश्यक आहे.


१) विभागीय शिक्षण उपसंचालक,सर्व

२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व 

३) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व

४) शिक्षणाधिकारी माध्यमिक / प्राथमिक, सर्व

५) प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा.सर्व


No comments:

Post a Comment