Search This Blog

Monday, August 2, 2021

HSC Result 2021

HSC Result 2021

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरऔरंगाबादमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारदिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

1.https://hscresult.11 thadmission.org.in

 

2. https://msbshse.co.in

 

3. hscresult.mkcl.org

 

4mahresult.nic.in

 

5. https://lokmat.news18.com

 

तसेच

www.mahresult.nic.in

 

https://msbshse.co.in


या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.


या सोबत

www.mahahsscboard.in


या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

सन २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व इ.१० वी मधील मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुणइ.११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व इ.१२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षासराव परीक्षासराव चाचण्यातत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच इ. १२ वी चे अंतिम तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे इ.१२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

दि.२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक / दोन संधी उपलब्ध राहतील.

 

अधिक माहितीसाठी एच.एस.सी. बोर्ड चे प्रकटण डाउनलोड करा.


------------------------------------------------------



------------------------------------------------------

No comments:

Post a Comment