Result and Document submission- Std. XII - 2021
बारावी गुण भरण्यासाठी महत्वाची माहिती
1) रिपिटर तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यी पर्यावरण व शा. शि. विषय विषय अगोदर उत्तीर्ण झालेले असतील तर त्यांना ऑनलाईन गुण भरतांना Exempted साठी E लिहावा लागेल. तो ऑप्शन सुरू झाला असेल किंवा लवकरच तो ऑप्शन उपलब्ध होईल. तेव्हा च या विद्यार्थ्यांचे गुण भरावेत.
2) सर्व विषय घेऊन परीक्षेला बसलेले रिपिटर विद्यार्थी असतील तर त्यांचे उत्तीर्ण विषयांच्या गुणांची आपोआप बेरीज होईल. ती बेरीज किंवा सरासरी चे ऑप्शन नाही म्हणून काही बिघडत नाही. दहावी व तोंडी अंतर्गत मूल्यमापन व प्रॅक्टिकल चे गुण भरा.
3) तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेले रिपिटर विद्यार्थी असतील तर त्यांचे कॉलेज कडे एच. एस. सी. बोर्ड ने पाठवलेल्या संपूर्ण कॉलेज च्या संकलीत निकाल तक्त्यावरून लेखी परीक्षेचे गुण काढावेत. मार्क शीट वरील 100 पैकी गुण ज्यात तोंडी प्रात्यक्षिक व अंतर्गत मुल्यमापन चे गुण असतील तर ते वजा करून 80 किंवा 70 पैकीच गुण घ्यावेत. अन्य कॉलेज/ शाळेतून विद्यार्थी आलेला असेल तर संबंधित कॉलेज किंवा शाळेशी संपर्क साधून लेखी परीक्षेत मिळालेले गुण प्राप्त करावेत.
4) तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेले रिपिटर विद्यार्थी तोंडी, अंतर्गत मूल्यमापन व प्रॅक्टिकल विषय नसलेले असतील (खूप जुने विद्यार्थी) तर अशा विद्यार्थ्यांनी जर 100 पैकी लेखी परीक्षा दिली असेल तर तेथे 100 पैकी उत्तीर्ण विषयांचे गुण सरासरी घेण्यासाठी व भारांश 40% किंवा 50% किंवा 35% यापैकी जे लागू असेल ते घ्यावे.
5) दि.23 पर्यंत ऑनलाईन गुण भरणे आवश्यक आहे.
6) संकलित तक्ते विषय गट करून तयार करून संकलन केंद्रावर जमा करावेत. म्हणजे समान विषयांचे विद्यार्थ्यांचे गट करून तक्ता बनवला तर तो लहान बनवता येईल. ऑप्शनल विषयांसाठी वाढीव तक्ते बनवू नये.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) सन - २०२१ परीक्षा मूल्यमापन व गुण भरणे या साठी वेबसाईट-
Std. XII- Marks filling websites:
बारावी विद्यार्थ्यांचे निकाल व प्रपत्रे जमा करणे:
महत्वाच्या सूचना:
१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीने प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रांची सिलबंद पाकिटे संकलन केंद्रावर जमा करण्यात यावीत.
२) सदर पाकिटांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व कागदपत्रांचे पृष्ठांकन करण्यात यावे व त्यासंबंधीचे पृष्ठ क्रमांक अचूकपणे सोबतच्या हमीपत्रामध्ये नमूद करण्यात यावे.
३) यासंदर्भात खालील सूचनाचे पालन करण्यात करुन, सोबतचे विहित हमीपत्र दोन प्रतीत परिपूर्ण भरुन एकच सिलबंद पाकीट वितरण केंद्रावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुखपत्रासह गुरुवार दि. ------/-----/२०२१ रोजी ------------ या वेळेत संकलन केंद्रावर जमा करण्यात यावीत.
संकलन करण्यापूर्वी करावयाची कारवाही:
१) संकलित माहिती तक्त्यातील अ क्र ०८ ते ११ याबाबत संकलित निकाल प्रतीवर / गुणपत्रिकेवर उजव्या बाजूला प्रत्येक विद्यार्थ्याचा सन २०२१ मधील इ १२ वी परीक्षेचा बैठक क्रमांक नमूद करावा.
२) राज्यमंडाळाचे परिपत्रकानुसार विषयात अथवा विषयातील सूट यामध्ये बदलामुळे MM नोंद केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती स्वतंत्र पाकिटात दुरुस्ती पाकिट (MM) व कनिष्ठ महाविद्यालय सांकेतिक क्रमांक अशी ठळक नोंद करुन देण्यात स्वतंत्र पाकीटातून देण्यात यावी.
३) अनुपस्थित विद्यार्थी (AA) नोंदी केलेल्या विद्यार्थ्याची माहिती अनुपस्थित विद्यार्थी (AA) नोंद करुन स्वतंत्र पाकीटातून देण्यात यावी. व आपल्या क.महा. सांकेतिक क्रमांकाची नोंद करून स्वतंत्र पाकिटातून देण्यात यावी.
४) यापूर्वी दिलेल्या ओएमआर (OMR) गुणपत्रिका मंडळाकडे पाठविण्यात येऊ नयेत.
५) महत्वाचे रिपिटर (पुनर्परिक्षार्थी) / तुरळक विषयाचे विद्यार्थ्याना त्यांच्या मागील परीक्षेच्या गुणांचे मुल्यमापन करण्यासाठी, पूर्वीच्या मंडळाने दिलेल्या पूर्वीच्या परीक्षेच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयनिहाय निकालपत्रकातील विषयांची विविध टप्प्यात दिलेली संपादणूक (लेखी/तोंडी/प्रात्याक्षिक) विचारात घेण्यात यावी. तसेच याबाबतच्या मंडळाकडे सादर करण्यात येणा-या विहित तक्त्यासोबत सदर पूर्वीच्या शाळानिहाय निकालपत्रकाची आणि मूळ गुणपत्रिकांची चालू परीक्षा बैठक क्रमांकांच्या नोंदीसह छायाप्रत, प्राचार्यांच्या सही / शिक्क्यासह प्रमाणित करुन सोबत जोडण्यात यावी.
६) क्र. १ते११ मधील सर्व वरीलप्रमाणे तयार केलेली स्वतंत्र पाकिटांचे एकच मोठे पाकिट तयार करुन त्यावर कनिष्ठ महाविद्यालय सांकेतीक क्रमांक टाकून त्या पाकिटावर अंतिम निकाल असे ठळक अक्षराने लिहावे व ते सिलबंद पाकिट संकलन केंद्रावर मंडळ प्रतिनिधीकडे जमा करावे. तसेच संदर्भ क्र. 3 च्या पत्रानुसार सुधारीत परिशिष्ट नमून्यात त्या. त्या संबंधित माहिती संकलित करून सादर करावी. संकलन केंद्रावर उपस्थित राहताना कोविड-१९ च्या शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे पालन करण्याबाबतच्या सूचना आपल्या प्रतिनिधीस देण्यात याव्या.
हमीपत्र:- कनिष्ठ महाविद्यालय सांकेतांक J --------- शासन निर्णय क्रमांक-परीक्षा ०६२१/प्र.क्र. ४६/एसडी-२, दि. ११ जून २०२१, शासन निर्णय क्रमांक- ०६२१ / प्र.क्र.५६/ एसडी-२, दि.०२ जुलै २०२१) व परिपत्रक क्र.रा.मं./परीक्षा-२/३८९० दि.०५/०७/२०२१ च्या अनुषंगाने आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ इ.१२वी परीक्षेसाठीच्या मूल्यमापन कार्यपध्दतीबाबत कार्यवाही पूर्ण करुन निकाल समितीने निकालाचे परीक्षण व नियमन करुन निकाल अंतिम केला आहे. त्यासंदर्भातील परिशिष्टे, विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक मूळ स्वाक्षरी प्रपत्रे सीलबंद स्वरुपात आज दिनांक ---/----/२०२१ रोजी येथील --------------------------------------------------------------- वितरण केंद्रावर विभागीय मंडळाकडे जमा करण्यासाठी सादर करीत आहोत. सीलबंद पाकिटात राज्यमंडळ परिपत्रकात नमुद केलेल्या खालील कागदपत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. |
कागदपत्रे यादी:
अ. नं. | तपशील | परिशिष्टे / अन्य बाबी | पृष्ठ क्रमांक | एकूण पृष्ठे | |
पासून | पर्यंत |
| |||
१ | नियमित विद्यार्थी (विषयनिहाय परिशिष्टे) | जे १.०१ ते जे १.१३ (लागू असलेली) |
|
|
|
२ | पुनर्परीक्षार्थी (विद्यार्थीनिहाय परिशिष्टे) | जे-२.०१ ते जे २.०८ (लागू असलेली) |
|
|
|
३ | खाजगी विद्यार्थी (विषयनिहाय परिशिष्ट) | जे-३.०१ ते जे ३.०७ (लागू असलेली) |
|
|
|
४ | तुरळक विषय घेऊन प्रविष्ट झालेले विद्यार्थी (विद्यार्थीनिहाय परिशिष्टे)
| जे ४.०१
|
|
|
|
५ | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा विद्यार्थीनिहाय सर्वोत्तम तीन विषयांच्या गुणांची सरासरी (राज्यमंडळाच्या विद्याथ्यांसाठी)
| जे आर १०१ |
|
|
|
६ | माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा विद्यार्थीनिहाय सर्वोत्तम तीन विषयांच्या गुणांची सरासरी (अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी)
| जे आर १०२ |
|
|
|
७ | संकलित निकाल तक्ते (नियमित व खाजगी विद्यार्थी कला, विणिज्य व विज्ञान व्दिलक्षी अभ्यासक्रम, एमसीव्हीसी, एनएसक्यूएफ)
| जे आर १०३ ते जे आर १०८ (लागू असलेली) |
|
|
|
८ | अन्य मंडळाच्या विद्यार्थ्याच्या इ.१०वी च्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
| गुण पत्रिका संख्या- |
|
|
|
९ | इ. ११वी च्या अंतिम संकलित निकालाची साक्षांकीत प्रत
| गुण पत्रिका संख्या- |
|
|
|
१० | इ.११वी अन्य मंडळातून / अन्य कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इ.११वीच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
| गुण पत्रिका संख्या- |
|
|
|
११ | तुरळक विषयास प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीच्या इ.१२वीच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत | गुण पत्रिका संख्या- |
|
|
|
Download the declaration in PDF
बारावी विद्यार्थ्यांचे निकाल व प्रपत्रे जमा करणे बाबत प्राचार्यांचे हमीपत्र डाउनलोड करा.
👇
प्राचार्यांचे हमीपत्र (डाउनलोड)
----------------------------------------------------
Evaluation process for Repeater students: -
बारावी तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसलेले विद्यार्थी यांचे मूल्यमापन करणे:
विषय इंग्रजी व मराठी नापास असेल तर:
१) इयत्ता दहावी च्या टॉप थ्री विषयांच्या गुणांची सरासरी काढावी.
२) इंग्रजी व मराठी हे विषय 80 + 20 या गटातील असल्याने दहावीच्या सरासरी गुणांचे 40% मध्ये रुपांतर करावे.
उदा. टॉप थ्री विषय गुण: 60+50+60=170
सरासरी: 170/3 = 56.66
40% गुण: = 22.65
पुर्णाकात: 23
३) बारावीतील उत्तीर्ण विषयांचे लेखी परीक्षेचे गुण कॉलेज ला एच. एस. सी. बोर्ड ने पाठवलेल्या संकलित निकाल पत्रातून 80 पैकी गुण शोधून काढावेत. या विषयांचे तोंडी, प्रात्यक्षिक किंवा अंतर्गत मूल्यमापन चे गुण सोडून द्यावेत. फक्त लेखी गुणांची बेरीज करून सरासरी काढावी. त्याचे 50% मध्ये रुपांतर करावे.
उदा. उत्तीर्ण विषय: 30+40+30+25=125
सरासरी: 31.25
50% गुण: 15.62
पुर्णाकात: 16
४) तोंडी परीक्षा- सन 2020-21 साठी या विद्यार्थ्यांची इंग्रजी व मराठी ची तोंडी परीक्षा घ्यावी. हे गुण दहावी व बारावी च्या गुणांमध्ये समाविष्ट करावेत.
उदा. दहावी 23 + बारावी 16 + तोंडी 15
= 54
सदर गुण या रिपीटर विद्यार्थ्यास इंग्रजी व मराठी साठी असतील.
No comments:
Post a Comment