प्रिय पालक,
कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१ -२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इ.८ वी ते १२ वी चे वर्ग दि.१५ जुलै २०२१ पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. सदर सर्वेक्षण सोमवार दि.१२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत सुरु राहील. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे.
सर्वेक्षण लिंक :
सर्वेक्षणाची अंतिम तारीख : सोमवार, दि.१२ जुलै २०२१ रोजी रात्री ११.५५ पर्यंत
-
दिनकर टेमकर
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment