विणकर विणे, भल्या पहाटे
का आनंदी आणि सुंदर वाटे
धीवरने जणू पंख निळे वाहिले
आम्ही विणतो, तान्हुल्या नवोन्मेशाचे वस्त्र पहिले.
विणकर विणे, कातरवेळी
का दिसे तेजोमय आणि चैतन्य डोळी
मयूरपंख जणू जांभळे पाचूचे मलमल
आम्ही विणतो, नवतारुण्याची शाल कोमल.
विणकर विणे, शितचांद राती,
का असे स्तब्ध अन् गंभीर संगती
शुभ्र जणू पिसारा, शुभ्र जणु मेघ पांढरा,
आम्ही विणतो, उपवस्त्र अखेरचे देही पांघरा.
प्रस्तुत कविता "इंडियन वीव्हर्स" ही नाईटिंगेल ऑफ इंडियन म्हणजेच सरोजिनी नायडू यांनी रचली आहे. कविता फारच लहान आहे कारण त्यात फक्त प्रत्येकी चार ओळींचे तीन श्लोक आहेत. ही कविता प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे पहिल्या दोन ओळी वक्त्याने भारतीय विणकरांना विचारलेले प्रश्न आहेत आणि पुढील दोन ओळी भारतीय विणकरांचे उत्तर आहेत.कवितेचा वक्ता दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या उद्देशाने विविध प्रकारची वस्त्रे विणतो.
कवितेची विषय हा जीवनचक्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही महत्त्वाच्या घटना असतात त्या म्हणजे जन्म, विवाह आणि मृत्यू. या तीन जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याची तुलना ही दिवसातील वेगवेगळ्या वेळासोबत तुलना केली आहे.
🔹तुलना🔸
1. मानवी जीवनाचे तीन टप्पे.
बाल्यावस्था, प्रौढ आणि वृद्धावस्था.
2. मानवी जीवनाचे तीन प्रसंग.
जन्म, विवाह आणि मृत्यू.
3. दिवसाच्या तीन वेळा.
सकाळ, संध्याकाळ आणि रात्र.
4. तीन भिन्न वस्त्रे.
नवजात मुलाचे कपडे, लग्नाचे बुरखे आणि अंत्यविधीचे आच्छादन.
5. कपड्यांचे वेगवेगळे रंग.
अंगरखा निळ्या रंगाचा, विवाहाचा बुरखा जांभळा आणि हिरवा आणि
अंत्यसंस्काराचा आच्छादन पांढरा रंगाचा आहे.
🟩⚪🔷🟩⚪🔷🟩⚪🔷
Complete Activities on poem and Poetic Appreciation.
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Section:-* *_Poetry_*
*Poem* *_"Indian Weavers"_*
*Std:-* *_12th_*
*Subject:-* *_English_*
🟩⚪🔷🟩⚪🔷🟩⚪🔷
⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️
https://blogofenglishforjuniorcollege.blogspot.com/2022/04/translation-of-poem-indian-weavers.html
No comments:
Post a Comment