NEET परीक्षेला जाताना महत्त्वाची माहिती
17 जुलै 2022
1. कपडे शक्यतो फिकट रंगाचे असावेत (अनिवार्य नाही).
2. शर्ट/टॉप हाफ भायाचा असणे अनिवार्य आहे.
3. कपड्यांवर शक्यतो मोठे बटन्स, ब्राउच किंवा मोठा डिझाईन्स असू नये.
4. पॉकेट, छोटे बटन, कॉलर किंवा चेन असलेले शर्ट, जीन्स पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट विद्यार्थी परिधान करू शकतात.
5. चप्पल किंवा कमी उंचीची सॅंडल घालून जाऊ शकतात. बूट/ जास्त उंचीची सॅंडल घालून जाता येणार नाही.
6. विद्यार्थ्यांनी हाफ भायाचा टी-शर्ट व नाईट पॅन्ट किंवा ट्रॅक पॅन्ट परिधान करणे उत्तम राहील.
7. विद्यार्थिनींनी टी-शर्ट किंवा सुती टॉप सोबत लेगिन्स वापरणे उत्तम राहील.
8)कोणताही अलंकार घालण्यास परवानगी नाही.
9)Admit Card वर फोटो चिकटवून घ्यावेत.सही मात्र परीक्षाकेंद्रावर पर्यवेक्षकासमोर करावी,
10)Hall ticket जमा करुन घेतले जाते,त्यामुळे आणखी दोन Hall ticket घरी काढून ठेवावेत.अॕडमिशनच्यावेळेस Hall ticket जमा करावे लागते.
11)परीक्षा केंद्रावर दोन तास अगोदर जावा.
12)परीक्षा केंद्रावर पेन पुरवला जातो.
13)जाताना पारदर्शक पाणी बाॕटल,मास्क,सॕनिटायझर बाॕटल घेऊन जाणे.
14)ओळखीच्या पुराव्यावरील फोटो Updated असावा
15)शांत डोक्याने पेपर सोडवा.टेंशन घेऊ नका.
16)सेक्शन B मधिल 15पैकी कोणतेही 10 अचूक प्रश्न सोडवा.
17)दिव्यांग विद्यार्थ्यांनी PWD certificate सोबत न्यावे.त्याची तपासणी झाल्यानंतर एक तास वेळ वाढवून मिळेल.
18)ज्या विद्यार्थ्यांनी application form भरताना लेखनिकाची मागणी केलेली आहे त्यांना NTA लेखनिक पुरवेल.आपला लेखनिक घेऊन जाऊ नये.
19)हजेरी पटावर Passport size photo चिकटवून सही करायची असल्याने सोबत दोन passport size photo घेऊन जाणे.
20)आधारकार्ड,पॕनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन्स.....इ.ओळखपत्र म्हणून घेऊन जात असताना त्यावरील फोटो हा अलिकडच्या काळातील असावा.
सर्वांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
No comments:
Post a Comment