Search This Blog

Thursday, June 24, 2021

Procedure of filling marks: Std. XII (Year 2020-21)

Procedure of filling marks: Std. X (Year 2020-21)

Procedure of filling marks: 

Std. X (Year 2020-21)

अधिक माहितीसाठी एस.एस.सी.बोर्डाच्या परीपत्रकांचे आवलोकन करावे:

दहावी निकाल तयार करताना  संगणक प्रणालीवर भरताना घ्यावयाची काळजी.

१) संगणक प्रणालीमध्ये सर्व गुण / श्रेणी / इतर मजकूर यांची नोंद करताना इंग्रजी अंक  अक्षरे वापरावीत . अन्य भाषेत , गुण / श्रेणी / इतर मजकूर संगणकीय प्रणालीमध्ये भरता येणार नाहीत.


२)  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (  .१० वी ) परीक्षा सन २०२०-२१ साठी मंडळाकडे परीक्षेची आवेदनपत्र भरुन नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचेच गुण / श्रेणी / इतर मजकूर मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये भरता येईलयासाठी एस.एस.सी.मंडळाच्या खालील वेबसाईटचा वापर करावा.

https://mh-ssc.ac.in

http://mahahsscboard.in

या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.


३) Password वापरुन परीक्षेची आवदेनपत्रे भरण्यासाठी माध्यमिक शाळांना देण्यात आलेला User Name ने login करण्यात यावे.


४) Login केल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार संगणकीय प्रणालीमध्ये दिसतील .

अ) नियमित ( Regular )

ब) पुनर्परीक्षार्थी ( Repeater )

क) खाजगी ( Private )

ख) तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे ( Isolated )

ग) एनएसक्युएफ अंतर्गत विषय घेऊन प्रविष्ट होणारे नियमित ( NSQF Regular )


५) माहिती भरण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा प्रकार निवडावा . सदर प्रकारावर क्लिक केल्यानंतर शाळेमार्फत आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी बैठक क्रमांक निहाय दिसेल.


६) विद्यार्थ्यांचे गुण नोंदविण्यासाठी त्याच्या नावापुढील " Fill Marks विद्यार्थ्याने परीक्षा आवेदनपत्रात भरलेले विषय दिसतील . या पर्यायावर क्लिक करावे . तद्नंतर प्रत्येक विषयासमोर दिलेल्या रकान्यांमध्ये विद्यार्थ्यास संबंधित विद्यार्थ्यास त्या त्या परीक्षा प्रकारात प्राप्त झालेले गुण / श्रेणी याची नोंद करावी . मात्र यासाठी निकाल समितीने पडताळणी करून अंतिम केलेले गुणच संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी ग्राहय धरण्यात यावेत.


७) ज्या विषयांची भाग -  भाग - अशी विभागणी दर्शविली आहे तेथे दोन्ही भागांसमोर दिलेल्या जागांमध्ये गुण नोंदवावेत.


८) संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेल्या विषयात बदल अथवा विषयातील सूट यामध्ये दुरूस्ती असल्यास सदर विषयासमोरील गुणांच्या सर्व रकान्यामध्ये MM असे दर्शवावे . सदर दुरूस्तीचा तपशिल / बदललेल्या विषयाचे गुण  इतर तपशिल संबंधित विभागीय मंडळास परिशिष्टा मध्ये नोंदवून वेगळया पाकीटात पुढील कार्यवाहीसाठी जमा करावे.


९) संगणक प्रणालीमध्ये माहिती भरताना नियमित खाजगी विद्यार्थी , नियमित  खाजगी पुनर्परीक्षार्थी म्हणून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (  .१० वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याकडे जर  . वी ते . वी या इयत्तांमधील ( लागू असल्याप्रमाणे अंतिम इयत्तेच्या ) गुणपत्रिकेची छायांकित प्रत उपलब्ध नसेल तर सदर विद्यार्थ्यांच्या परिशिष्टातील संबंधित रकान्यात तूर्त MM असे दर्शवावे . सदरचा तपशिल प्राप्त करून घेऊन संबंधित विभागीय मंडळास परिशिष्टामध्ये नोंदवून वेगळया पाकीटात पुढील कार्यवाहीसाठी जमा करावे.


१०) विद्यार्थ्याची विषयनिहाय माहिती भरल्यानंतर " Submit " या पर्यायावर क्लिक करावे . विद्यार्थ्यांच्या भरलेल्या गुणांची पुनःश्च पडताळणी करण्यासाठी " Report " या पर्यायावर क्लिक करावे

१) एकदा भरलेले गुण / श्रेणी यामध्ये आवश्यकता असल्यास " Edit Marks " हा पर्याय निवडून बदल करता येईल.


१२) उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्याच्या नावासमोर " Confirm " हा पर्याय उपलब्ध होईल , तो क्लिक करणे अनिवार्य आहे . विद्यार्थ्याची माहिती " Confirm " केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही . तसेच " Confirm " या पर्यायावर क्लिक केल्याशिवाय गुण ग्राहय धरले जाणार नाही.


१३) प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुण नोंदणीसाठी वरीलप्रमाणे स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.


१४) " Report " मेनू वर जाऊन आवश्यकता असल्यास संबंधित फाईल Download करता येईल.


१५) अतिविलंब / विशेष अतिविलंब / अतिविशेष अतिविलंब शुल्काने उशिरा आवेदनत्र भरल्याने अथवा अन्य कारणाने , ज्या विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक  इतर माहिती संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध नसेल अशा विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बैठक क्रमांक विभागीय मंडळाकडून प्राप्त करून घेण्यात यावा . सदर विद्यार्थ्याचे गुण / श्रेणी / अन्य तपशिल बैठक क्रमांकासह परिशिष्ठमध्ये भरण्यात यावेत  सिलबंद पाकीटातून विभागीय मंडळाकडे जमा करावे . अशा अतिरिक्त बैठक क्रमांकाबाबत संबंधित विभागीय मंडळामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.


महत्वाचे-

संगणक प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे गुण / श्रेणी / इतर मजकूर यांची नोंद करण्याची कार्यवाही दि .२३ /  / २०२१ ( सकाळी ११.३० पासून ) ते दि . /  / २०२१ या कालावधीतच करणे अनिवार्य आहे . तद्नंतर यासाठी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही. 

No comments:

Post a Comment