Search This Blog

Thursday, June 17, 2021

*इ.१२ वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना:-*

सर्व शिक्षक बंधू-भगिनींना नमस्कार...🙏🏻🙏🏻

*इ.१२ वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना:-*

              इयत्ता बारावी शैक्षणिक वर्ष 2020- 21 परीक्षेसंदर्भात सीबीएसईने सुप्रीम कोर्टात मूल्यांकना बाबत एक पॅटर्न दिला आहे. सुप्रीम कोर्टाने त्या पॅटर्नचा स्वीकार केला आहे. लवकरच शासनाकडून परिपत्रक येईल.

१) 30 टक्के इयत्ता दहावीचे गुण 

२)30 टक्के इयत्ता अकरावीचे गुण व

३) 40 टक्के मध्ये इयत्ता बारावीचे इंटरनल असेसमेंट आहे.

*इंटरनल असेसमेंट:-*

         विज्ञान विषयासाठी प्रात्यक्षिक पुस्तिका व टिटोरियल्स आहे. तसेच विज्ञान विषयासाठी प्रात्यक्षिक परीक्षा डेमोस्टेशन घेणे विचाराधीन आहे.
         इतर विषयांसाठी इंटरनल असेसमेंट मध्ये स्वाध्याय, निबंध व गृहपाठ 20 गुण व तोंडी परीक्षेचे 20 गुण याप्रमाणे मूल्यमापन करावयाचे आहे.
          पर्यावरणासाठी शासनाने दिलेली प्रकल्प वहीत प्रकल्प लिहून द्यावयाचा आहे.

             स्वाध्याय साठी लवकरच प्रश्नपत्रिका ग्रुप वर टाकण्यात येतील.
 त्या प्रश्नपत्रिका आपण घरी लिहून स्वाध्याय लवकरात लवकर जमा करावे.
               हा निकाल बोर्डाचा असून लवकरात लवकर सर्व स्वाध्याय, पर्यावरण प्रकल्प वही, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण प्रोजेक्ट वही जमा करावे.

              *इंटरनल असेसमेंट लवकरात लवकर जमा न केल्यास आपला निकाल राखीव राहील्यास आपण वैयक्तिक जबाबदार राहणार आहात, हे सर्व गुण बोर्डाकडे पाठवले जातील, म्हणून शक्य तितक्या लवकर आठ दिवसाच्या आत सर्व साहित्य आपल्या वर्गशिक्षक कडे जमा करावे.*

      *@ शासनाकडून अजून अधिकृत परिपत्रक आलेले नाही तरी पूर्वतयारी म्हणून आपण ही पूर्वतयारी करीत आहोत. वेळेवर आपली धावपळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.*

*टीप:- सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र फुल साइज 40 पेज रजिस्टर घेऊन पहिल्या पेजवर आपले संपूर्ण नाव, रजिस्टर नंबर, मोबाईल नंबर, इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेचा नंबर व आपला निवासी पत्ता व ठळक मोठ्या अक्षरात विषयाची नोंद करणे अनिवार्य आहे.*
            *सर्व सहा विषयांचे स्वतंत्र स्वाध्याय राजिस्टरवर, पर्यावरण प्रकल्प रजिस्टर, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण प्रकल्प, विज्ञान प्रात्यक्षिक पुस्तिका  जमा करत असताना सोबत इ.१०वीचे गुणपत्रकाची झेरॉक्स व इ.११वीच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत (अटेस्टेड केलेली असावी ) सोबत देणे अत्यावश्यक आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.*

जनविकास महाविद्यालय, बनसारोळा. 

ता. केज जि. बीड

No comments:

Post a Comment