Search This Blog

Thursday, June 17, 2021

सीबीएसई प्रमाणेच स्टेट बोर्ड देखील वापरणार बारावीसाठी 30:30:40 फॉर्म्यूला. (HSC)



*CBSE ने सांगितला १२ वी निकालाचा फॉर्म्युला; निकाला ३१ जुलै २०२१ पर्यंत जाहीर केला जाईल*
CBSE 12th Plea In SC: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)च्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे मूल्यांकन निकष गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केले. मूल्यांकनासाठी ३०:३०:४० क्रायटेरिया लागू केला जाणार आहे. विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी आणि बारावीतले गुण बारावीच्या निकालासाठी विचारात घेतले जाणार आहेत. यानुसार निकाल कसा लावण्यात येईल, हेही वेणुगोपाल यांनी कळवले. तसेच बारावीचा निकाल ३१ जुलै २०२१ पर्यंत जाहीर केला जाईल, अशी माहितीही कोर्टाला दिली.
केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालात खंडपीठासमोर सीबीएसई बोर्डाच्या दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकन पद्धतीचे निकष सादर केले. यानुसार, विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यासाठी त्याचे दहावी, अकरावी आणि बारावीतील बेस्ट तीन विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज, अकरावीच्या गुणांसाठी ३० टक्के वेटेज तर बारावीच्या गुणांसाठी ४० टक्के वेटेज दिले जाणार आहे. यासाठी टर्म परीक्षांच्या पाच पैकी तीन विषयांचे गुण विचारात घेतले जातील. बारावीच्या मूल्यमापनासाठी युनिट, टर्म आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक शाळेत निकाल समिती स्थापन करण्यात येईल. कोणत्याही विद्यार्थ्याला अनावश्यक वाढीव गुण मिळणार नाहीत, याची जबाबदारी या समितीवर असेल, असे वेणुगोपाळ यांनी कोर्टाला सांगितले.

No comments:

Post a Comment