*1.4 Big Data - Big Insights.* हा आपला 4th lesson.
आपण पाहीले असेल या पाठास कुठलाही author नाही किंवा introduction नाही. हा lesson म्हणजे scientific information आहे जी ईकडून तिकडून accumulate केलेली information technology क्षेत्रातील ही genral information आहे. जी आपल्या दररोजच्या उपयोगातील आहे.
या lesson ची central idea मी आपल्यासमोर ठेवत आहे. *Data is fuel* अशी एक म्हण आहे. म्हणजे माहीती हे एक ईंधन आहे. ज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल ची किंमत असते तशीच Data ची किंमत valuable असते.
*What is big data?*
आपण सर्वजण youtube, whatsapp, facebook, instgram, MX player, netflix, flipkart, amezon या social website चा दैनंदिन वापर करत आहोत. पण तुम्ही social website वरच्या Data ची power तपासुन बघा कशी असते. तुम्ही एक प्रयोग करा. Google search वर एखादा मोबाईल, टिव्ही, किंवा एखादी गाडी search करा. तुम्हाला लगेच त्या Data ची power काय असते ते दिसेल. तुम्ही google वर search करून लगेच youtube, facebook instgram किंवा social sights वर गेलात तर तिथे लगेचच तुम्ही जे search केलं होतं त्या गोष्टींच्या प्रत्येक ठिकाणी advertise दिसायला लागतील.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे झाले. तर तुम्ही ज्या ठिकाणी search केलं होतं त्या ठिकाणाहून सगळ्यांनी recognize केलं आणि cookies वरून तो data analyse करून तुम्हाला त्या advertise करायला सुरूवात केलं. याला म्हणायचं target based advertisement आणि सध्या याचंच मोठं boom आहे.
21 व्या शतकातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी Big Insights एक महत्त्वपूर्ण lesson आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, प्रत्येकास सामायिक, संग्रहित आणि विश्लेषित केलेल्या माहितीचे महत्त्व माहित असले पाहिजे. Data इतका प्रचंड आहे की मोठ्या Data मधील analyse लहान असल्यासारखे दिसते. हा Lesson वाचण्यामुळे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना मोठी अंतर्दृष्टी मिळते. आपणांस केबी (किलो बाइट), एमबी (मेगा बाइट), जीबी (गिगा बाइट) आणि टीबी (टेरा बाइट) या शब्दांची माहिती आहे. हे माहितीचे उपाय आहेत (Data)
या lesson च्या माध्यमातून Data चे नेमके अर्थ काय आणि ते किती विशाल आहे हे आपणांस समजते. Whatsapp, facebook, twitter आणि अन्य social media वरील आपले सामाजिकिकरण, Amezon, flipkart, snap-deal वरचे आपले online व्यवहार record केले गेले आहेत आणि त्यांचे विश्लेषण केले गेले आहे. हा Data वेगवेगळ्या संस्था वापरतात.
आपणांस वस्तू आणि सेवांच्या विक्रीसाठी अज्ञातांकडून call, e-mail आणि messages प्राप्त होतात. जेव्हा आपले मूल 9 वी किंवा 10 वी मध्ये असते तेव्हा आपल्याला कोचिंग क्लासेसचे messages येतात. आपण कधी हा विचार केला आहे का की आपल्या मुलास दहावीत आहे हे त्यांना कसे कळले ? त्यांना मोठ्या डेटामधून अशी माहिती मिळते. आपल्या online क्रियाकलापांचे संग्रह आणि विश्लेषण केले जाते. शॉपिंग वेबसाइटवर सर्फिंग करताना ते आपल्या आवडीच्या गोष्टी प्रथम दाखवतात.
*हा lesson तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देऊन जाईल हे नक्कीच.*
तुम्हाला हे माहित आहे का कि online data कुठून collect होतो? परंतु data आपणच पुरवत आसतो. आज आपण कुठलेही app download केल्यानंतर ते app आपण cell मध्ये install करताना access मागतं. Access to contact , access to photos, access to videos, याचा अर्थ काय असतो तर त्या app चा server जो आहे तो तुमच्या cell मधल्या सगळ्या data ला access मागतोय म्हणजे तो तुमच्या मोबाईल मधून literally तुमचा data घेऊन store करतोय. Even truecaller ला कसं कळतं की अमुक एक नंबर कोणाचा आहे. तर truecaller तुमच्या contact list मधले सर्व नंबर server ला घेतं आणि त्यामधूनच ते सांगतं की तो नंबर कोणाचा आहे. ते नाव आपणच save केलेलं असतं, कधीकधी नाव येतं "my pappa" कारण आपणच ते नाव save केलेलं असतं. हे असं असतं data analyse.
तुम्ही 12th नंतर computer science करत असाल तर machine learning & artificial learning या गोष्टींना येणाऱ्या काळात big scope आहे. Collective data चे पुढिलप्रमाणे संग्रहित उपयोग आहेत.
*Uses of big data.
*1.Location tracking:*
आपणांस रहदारी आणि एकेरी मार्ग आणि अपघात प्रवण भागांची माहिती मिळण्यासाठी तसेच जी गल्ली, जे गाव आपल्याला माहीत नसते ते अमेरिकास्थित google company ला कसे माहीत होते? तर हे सगळे आपण दिलेल्या update मूळे possible होते. आपण टाकलेले गल्लीचे, गावाचे नाव automatically GPS वर save होत असते. म्हणजेच ते आपला data वापरून update होत असतात.
*2.Understanding the weather patterns.*
हवामानात होणारे बदल, भुकंप, महापूर, त्सुनामी या सर्व गोष्टींचा alert होण्यासाठी weather sensors आणि satellite पृथ्वीवर व अवकाशात बसवलेले आहेत. या powerful data मधूनच आपल्याला सगळ्या गोष्टींचा alert मिळत असतो.
*3. Health care industry.*
आरोग्यावर आधारीत data सतत गोळा केला जातो. सध्या सुरू असलेल्या civid19 या महारोगाची vaccine (लस) तयार करण्यासाठी खुप सारा data जगभर गोळा केला जात आहे.
*4. Banking finance and trading.*
गुंतवणूकदारांच्या गरजा जाणून घेण्यासाठी योग्य योजना तयार करता येतात.आर्थिक बाजारावर लक्ष ठेवता येते. तसेच बँकेत गेल्यानंतर एखाद्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्या व्यक्तिची अगोदर पत पाहीली जाते. म्हणजे त्या व्यक्तिचे net वर नाव टाकल्याबरोबर त्याचा व्यवहार कसा आहे ते समजते. हे data analyse मुळे शक्य होते.
*5. Sports*
क्रिकेटच्या match मध्ये data analyse चा खुप मोठा अनुभव आपण सर्वजण घेतोत. एखादा player ground वर उतरल्याबरोबर त्या player ची पुर्ण information screen वर side ला दिलेली असते. हा data वेळोवेळी update केलेला असतो. तसेच खेळाडूंनी कामगिरी सुधारण्यासाठी Data चा वापर केला.
*6 Advirtising*
facebook, google, twitter, or any other online giant वर सतत advertising सुरू असते.
*7. Entertainment and media.*
Netflix & youtube यांच्या माध्यमातून big data गोळा केला जातो.
*8.Education Industry.*
शैक्षणिक क्षेत्रामध्ये online data भरपूर उपलब्ध आहे आणि त्यामध्ये सतत वाढ होत आहे.
या धड्याचा अभ्यास केल्यानंतर आपणांस data world wide बद्दल चांगल्या प्रकारे माहिती घेता येऊ शकते. शिक्षण प्रणाली सुधारित करण्यासाठी आपणांस अशा data चा वापर करण्याचा एक मार्ग सापडतो. काय सार्वजनिक करावे आणि काय नाही याची खबरदारी आपण घेऊ शकतो. आपले क्रेडिट्स / डेबिट कार्डचे password आणि pincode सार्वजनिक करू नका असा इशारा दिला जातो. कारण या गोष्टी confidential आहेत.
English language शिकण्याबरोबरच जगाचं ज्ञान देण्याचं हे 12th English चं book करतंय त्यामूळेच Big Data - Big Insights हा lesson ऊपयोगी पडतो.
*दररोज आपण आपल्या Janvikas English Subject या आपल्या webpage वर जी माहीती अदान - प्रदान करत आहोत, तो सुद्धा या lesson चाच एक भाग आहे. जगातील सर्वोत्तम information चा स्रोत मी आपल्यासाठीच आणून ठेवला आहे. या huge data मूळे आपल्या study मध्ये भरपूर ऊपयोग व्हावा हीच ईच्छा.*
*1.4 Big Data Big Insights अनुवाद - Umakant Gore. Janvikas Mahavidyalaya*
No comments:
Post a Comment