2.3 The Inchcape Rock
*Title Of The Text:*
Inchcape Rock एक आख्यायिका आहे, स्कॉटलंडमधील अँगसच्या किनारपट्टीच्या प्रदेशाच्या जवळ, उत्तर समुद्रात पसरलेला पाण्याखाली बुडालेला दगडाचा एक भाग आहे. स्कॉटलंडच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील धोकादायक खडकांभोवती घडलेल्या घटनांच्या मालिकेवर ही कविता आधारित आहे.
*Poet Robert Southy:*
कवीचा जन्म इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे झाला होता. ते 1813 ते 1843 या काळात इंग्लंडचे राजकवी होते. ‘The Scholar’ सारख्या त्यांच्या काही छोट्या कविता. ‘The Battle Of Blenheim’, ‘Bishop Hatto’, ‘The Inchchape Rock’ इत्यादी कविता शाळकरी मुलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
*Theme Of The Poem:*
जे लोक चुकीच्या गोष्टी करतात त्यांना योग्य शिक्षा मिळेल असा संदेश कवी आपल्याला या कवितेमधून देतो. थोडक्यात - "आपण पेरतो तसे उगवते ".
*Story Depicted InThe Poem*
एका शांत नोंदीवर कविता सुरू होते. इंचकेप खडकावर लाटा काहीही परिणाम न करता वाहत होत्या. Aberbrothock चा एक संत माणूस Abbot याने धोकादायक खडकांबद्दल खलाशांना इशारा देण्यासाठी ईंचकेप रॉक्सवर एक घंटा बसवली होती.
जेव्हा समुद्री चाचा राल्फने ती घंटा पाहिली तेव्हा त्याला अॅबॉटच्या लोकप्रियतेचा हेवा वाटू लागला. म्हणून त्याने बेल कापण्याचे ठरविले. त्याने आपल्या माणसांना त्या घंटेकडे जहाज वळवण्यास सांगितले. त्याने बेलची दोरी कापली आणि घोर आवाजाचा घंटानाद करत ती बेल समुद्राच्या तळाशी गेली केला.
राल्फ तिथून पुढे निघाला. पुढे जहाजांची लूट करुन तो आपल्या देशात परत जात होता. अचानक हवामान खराब होत चालले होते. दाट धुक्यांनी आकाश आच्छादले होते. एक हिंसक वादळ वाहू लागले. खराब हवामानामुळे काहीही दिसत नव्हते. परंतु राल्फला खात्री होती की हवामान लवकरच सुधारेल. नाविकांची इच्छा होती की त्यांनी ईंचकेप बेल ऐकावी. परंतु आधीच तो कापला गेल्याने त्यांना काही आवाज ऐकू आला नाही. शेवटी ते जहाज समुद्रात फिरून ईंचकेप खडकाशी धडकले आणि त्याच्या सर्व खलाशांसह बुडाले. परंतु राल्फ मरण पावताना भीतीने राल्फला एक गोष्ट ऐकू आली. तो कर्कश घंटांचा आवाज होता. खरं तर तो भूतासारखा आवाज वाटत होता जो त्याच्या गुडघे आदळण्यामूळे येत होता.
*Paraphrase - Stanza (श्लोक) 01-04*
वातावरण शांत आणि गतिहीन होते. हवेमध्ये आणि समुद्रामध्ये हालचालीचा अभाव होता. आकाशातून शिडासाठी(मास्टचे कापड) कोणतीही शक्ती नव्हती. हे जहाज आणि जहाजाच्या गतीला समुद्रात गतिहीन बनविते. समुद्राच्या लाटा कोणत्याही धक्क्याशिवाय वाहू लागल्या होत्या आणि थोडीशी वाढ झाली होती आणि इंचकेप दगडावर त्या आदळत होत्या आणि त्या लाटांमूळे इंचकेप बेल कठोरपणे वाजत होती.
Aberbrothok च्या Abbot या संत माणसाने इंचकेप रॉक येथे एका खडकावर घंटा अशा प्रकारे स्थापित केली होती की ती वादळाच्या वेळी लहरींवर आदळत होती. भरपूर नाविकांनी Aberbrothok च्या Abbot चे कौतुक केले कारण उच्च लाटांमध्ये घंटाच्या चेतावणीच्या आवाजाने धोकादायक खडक त्यांना माहित होऊ लागला ज्यामूळे त्या नाविकांचे प्राण वाचू लागले.
*Paraphrase - Stanza (श्लोक) 05-08*
आकाशात सुर्य आनंदाने चमकत होता. त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व प्राणी खूप आनंदित झाले होते. समुद्री पक्षी आकाशात घिरट्या घालताना खूप आनंदात दिसत होते. विखुरलेल्या हिरव्या महासागरामध्ये ईंचकेप बेलचे फ्लोटर एका गडद जागेसारखे दिसत होते. जेव्हा सर राल्फ द रोव्हर जहाजात चढला, तेव्हा त्याने त्या गडद फ्लोटरकडे टक लावून पाहिले. वसंत ऋतुतून त्याला जास्त उत्साह वाटू वाटला त्यामुळे त्याने शिट्टी वाजवून गाणे म्हणायला सूरूवात केली. त्याचे हृदय आनंदाने भरलेले असले तरी, त्याच्या आनंदात द्वेष होता. जेव्हा त्याने इंचकेप फ्लोटर पाहिले तेव्हा त्याने आपल्या माणसांना आपले जहाज पोर्ट एस्कॉर्टला सोडून इंचकेप रॉकवर नेण्यास सांगितले व तेथेच अॅबरब्रोथोकच्या अॅबॉटला त्रास देण्याची इच्छा व्यक्त केली.
*Paraphrase- (Stanza) श्लोक 09-12*
नौकाविहारी माणसे बोट खाली करतात आणि इंचकेप रॉककडे जातात. जेव्हा ते तेथे पोचले तेव्हा सर राल्फ नावेतून खाली वाकला आणि बेलच्या दोरीला इंचकेप फ्लोटरमधून कापले. बेल जोरदार बुडबूड आवाज करत खोल पाण्यात बुडाली, पाण्याच्या वर फुगे उठले आणि आजूबाजूला फुटले. मग सर राल्फ म्हणाला की पुढे जो खडकावर येईल तो अॅबरब्रोथोकच्या मठाधिपतीची प्रशंसा करणार नाही. सर राल्फ द रोव्हर बऱ्याच दिवसांपासून जहाजाच्या शोधात निघाला आणि त्यांच्यावरील मौल्यवान वस्तू लुटली आणि श्रीमंत झाला. त्यानंतर, तो स्कॉटलंडच्या किनाऱ्यावर गेला. एक दाट धुके आकाशात सर्वत्र पसरले म्हणून त्याला उन्हात उंच उंच कडक भाग दिसला. दिवसभर वारा वाहून गेला आणि संध्याकाळी थांबला तो वारा थांबला .
*Paraphrase - Stanza (श्लोक) 13 ते 17*
सर राल्फ द रोव्हर अतिशय आत्मविश्वासाने डेकवर उभा होता इतका अंधार होता की आजूबाजूची कसलीही जमीन तो पाहू शकला नाही. मग सर राल्फ म्हणाले की चंद्र लवकरच उगवणार असल्याने लवकरच थोडा प्रकाश येईल. त्यांच्यापैकी एकाने विचारले की त्यांना लाटांचा आवाज ऐकू येईल काय? कारण त्याला वाटते की ते किनाऱ्याजवळ असले पाहिजेत. त्यांना असे वाटले की ते एका बेटाजवळ आहेत हे त्यांना लक्षात आले आणि त्यांना इंचकेप बेल ऐकू येईल अशी आशा वाटू लागली. लाटांचा आवाज खूप जास्त होता त्यामूळे त्यांना कोणताही आवाज ऐकू येत नव्हता. वारा खूपच वेगवान असला तरी, त्यांचे जहाज थरथर कापत पुढे सरकले. मग त्यातील एकाने प्रभु ख्रिस्ताला विनवणी केली व तो इंचकेप रॉक असल्याचा उद्गार काढला. सर राल्फ द रोव्हर पूर्णपणे निराश झाला आणि त्याने निराश होऊन स्वत: ला शाप दिला. लाटा सर्वत्र अगदी वेगाने घुसल्या आणि जहाज पाण्याखाली खाली जाऊ लागले. भीतीने तो मरत असताना रोव्हरला एक भीषण आवाज ऐकू आला. आवाज खाली जात असताना इंचकेप बेल सारखाच होता. जणू काय वाईटाचा आवाज त्याच्यासाठी मरणार आहे. *जो दुसऱ्यांसाठी खंदक खोदतो, तो त्याच दिवशी त्या खंदकात पडतो.*
आशाप्रकारे 2.3 Inchcape Rock ही कविता चांगल्याप्रकारे सादर केली आहे.
भाषांतर - गोरे उमाकांत चंद्रकांत.
जनविकास महाविद्यालय, बनसारोळा.
No comments:
Post a Comment